Friday, July 31, 2015

गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा
दर वर्षी येते . आषाढ पौर्णिमा . इतकी वर्ष तिचे महत्व व्याकीत्श: शाळा कॉलेज मधील शिक्षका  बद्दल आदर क्रुतद्यता व्यक्त करायचा दिवस एवढाच होते . उरलेले ३६४ दिवस त्यांना 'नावे' ठेवायला मोकळे ?
जशी maturity (?) आलि ह्या days कडे बघायचा दृष्टीकोन  बदलायला शिकवले गेले.

गुरु
शिक्षण देणारा,धडे गिरवून घेणारा,वागणे बोलणे, शिकविणारी व्यक्ति.
प्रथे प्रमाणे आणि सत्य आहे म्हणून आद्य गुरु     आई  .
मग शालेय शिक्षक (मानांकने देण्याची माझी औकात नाही ) म्हणून जसे आठवतील तसे , कॉलेज जिथे काम करू तेथीलं mentor वैगरे. आणि गुरु म्हटले की अध्यात्मिक गुरु एखादा बाबा,मां आठवतात .
प्रत्क्याक्षात आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी वा काहीतरीच शिकवत असते न
मग तो रहदारीचे नियम (specially पुण्यात )खुशाल तोडून आपले वाहन दामटविणारे" घोडे" मला शिकवतात कि तू अस नाही करायचे .
mobile आले . keypad वाला ते touch scree handsets ह्या प्रवसात माझे junior मित्र आणि अपत्य हे माझे गुरु झाले .
 ह्या इलेक्ट्रोनिक जगात आपण मागे राहायचे नाही म्हणून जिद्दीने वय   ८५चे आजोबा computer  क्लास ला जातात tweeter /blog  सहज चालविणारे खूप काही सांगतात
स्नानगृहात गाणी गाताना(sorry रेकताना ) एक कुठूनतरी कानी पडलेली सुरेल तान मला शिकवते बाबा रे तू फक्त ऐक
पिझ्झा हुत समोरचा भिकारी ऐकवतो  ४/४ मैदा लेते हो और मुझे देते समय चव्वंनी धुंडते हो  काय बोलू सांगा

दमेकर्याचे श्वास घेताना झगडणे मला शिकवते तुझा सहज श्वास हाच एक सोहळा आहे रे.
स्मशानातून परत येताना सगळे problems विसरून मृत्यू शिकवतो अरे आत्ता आहेस हाच सण  आहे
असे असंख्य गुरु शोध्ण्याचे नेत्र मला दिले ते खरे गुरु
आपले गुण दोष झाकून इतराची उणी दुणी बघणे सहज सोप्पा आहे . स्वतः चे परीक्षण करणे शिकवेल तो गुरु
विपरीत परीस्थितीत ठाम पाने उभ राहायला  पईपे वरचे रोप शिकवते
स्व परीक्षणात काय आणि कसे तपासायचे काय सुधारायचे  ते सान्ग्तो तो गुरु
ह्या मध्ये म खरोखरचे अध्यात्मिक व्यक्तिमत्व ते रस्त्यावरून जाणारा अनोळखी इसम आपले गुरु असू शकतात
ज्यांनी मला धडे दिले /शिकविले अश्या आणि
माझ्या आयुष्यात आलेल्या  असंख्य गुरुना माझा आदराचा कृतज्ञतेचा प्रणाम


No comments:

Post a Comment